Lyrics of Nahi Prem Chitti from album Pipasa Pasarali

नाही प्रेम चित्ती
नाही प्रेम चित्ती त्याची कैसी भक्ती ।
प्रेमची प्रचीति बापू-कृपेची ॥ धृ ॥
केली सारी साधने परि मन रूक्ष ।
तया पुंडरीकाक्ष पावे कैसा ।
खरा भक्त ज्यासी अनिरुद्ध प्रीती।
सारे संत सांगती हेचि मर्म ॥ १ ॥
प्रेमे पुंडलीके दिधल्या विटेवरी ।
उभा देव पंढरी आवडीने ।
जिजाईपायीचा काटा प्रेमे काढी ।
विठ्ठलासी गोडी प्रीतीमध्ये ॥
योगीन्द्र वानतो प्रेमाचा महिमा
प्रेम हाच आत्मा अनिरुद्धाचा ॥