Lyrics of Naathsamvidh Naathsamvidh from album Pipasa 3

नाथसंविध् नाथसंविध्
नाथसंविध् नाथसंविध्,
हृदयासी धरी माझा देव अनिरुद्ध॥
तो चित्रकार थोर, आम्ही भक्त पामर।
आम्हासाठी बदले हा चित्र वारंवार॥
जीवनाची भूमी जरी जाहली उजाड।
ह्याने नदी पाठविली, फोडूनी पहाड॥
सुखदुःखाच्या वावटळी येत आणि जात।
ह्याने दिले ऐसे घर, ज्यात ना हो घात॥
चित्र, नदी, घर सारे नाथसंविध्।
पिसा म्हणे खरे दान देई अनिरुद्ध॥