Lyrics of Naam Ghyave Mhanoni from album Pipasa Pasarali

नाम घ्यावे म्हणूनि, मिटता रे डोळे
नाम घ्यावे म्हणोनि, मिटता रे डोळे,
नाम थबकले, दिसता तूचि ॥ धृ ॥
चालवितो जप, अंतरीची माळ ॥
हृदय धरी ताल, वृंदगान ॥ १ ॥
सृष्टी धरी फेर, गरजते नाम ॥
अनिरुध्द धाम, चिरशांत ॥ २ ॥
आईच्या मायेत, बाळ जे निजत ॥
ते सदा निश्चिंत, पूर्वा म्हणे ॥ ३ ॥