Lyrics of Naam Gheta Uraapoti from album Pipasa 2

नाम घेता उरा पोटी
नाम घेता उरा पोटी। ब्रह्म धरिते आकृति॥
कशा ज्ञानाची अटाटी। ब्रह्म सावळे सामोरी॥
व्यर्थ करिता शब्दभार। अवघे मायेचे भांडार॥
प्रेमे करावी हो सेवा। भक्ति ब्रह्माचे माहेर॥
मिळे आनंद आकाश। ज्यास म्हणती ब्रह्मज्ञान॥
अनिरुध्द प्रेमातचि। भरूनि राही परब्रह्म॥
पिपा म्हणे अनिरुध्दाने। मजसी नेले ह्याचि मार्गे॥
तुम्ही धावा रे सत्वर। बापू उभाचि तत्पर॥