Lyrics of Naam Gheta Aniruddhache from album Bol Bol Vaache

8. नाव घेता अनिरुद्धाचे
नाव घेता अनिरुद्धाचे, अनिरुद्धाचे, अनिरुद्धाचे, दुष्ट खालती बैसले ।
ऐका ऐका भक्तगण, तुम्ही घाबरू नका आता ।
शत्रूच्या आक्रमणाला,
जी हां जी, जी जी रं, जी जी रं, जी जी रं जी ॥धृ॥
अरे त्याने वसा घेतला, त्याने तुमच्यापुढे ठेविला।
घे रे घे रे नामधरा, हो सरळ धरावे आता ।
अनिरुद्धाच्या पायाला, त्याच्या पायाला,
जी हां जी, जी जी रं, जी जी रं, जी जी रं जी ॥१॥
ऐक कलिच्या नायका, अरे नायका, अरे नायका छळवाद तू रे माझा केला।
दिले दुःख आणि दैन्याला।
पण आज बाप तुझा आला
जी हां जी, जी जी रं, जी जी रं, जी जी रं जी ॥२॥
अरे आता काय चालेना, तुझ्या करणीची वंचना।
घेऊन तुझ्या दळभाळा।
आल्या वाटेने जावे मसणाला
जी हां जी, जी जी रं, जी जी रं, जी जी रं जी ॥३॥
आला आला अनिरुद्ध आला, अनिरुद्ध आला, अनिरुद्ध आला
माझ्या देवाचा देव हा आला, दुष्टांचा नाश करण्याला, गीतेचा शब्द धरण्याला,
सत्याचा मान करण्याला, सत्तेची मान धरण्याला,
भक्तांना प्रेम देण्याला, साधूंना धैर्य देण्याला,
जी हां जी, जी जी रं, जी जी रं, जी जी रं जी
अनिरुद्ध आला रे आला, माझ्या देवाचा देव हा आला
माझ्या स्वप्नीचा देव हा आला, माझ्या तर्काचा देव हा आला
माझ्या शंकेचा देव हा आला, माझ्या हाकेला देव हा आला
माझा अनिरुद्ध आला, माझा अनिरुद्ध आला,
माझा अनिरुद्ध आला जी हां जी,
अनिरुद्ध आला जी हां जी, जी जी रं, जी जी रं, जी जी रं जी