Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Mukhicha Gajar from album Pipasa 2

Lyrics of Mukhicha Gajar from album Pipasa 2

मुखीचा गजर मनामध्ये जावो



मुखीचा गजर मनामध्ये जावो ।
अरे सरत्या क्षणाला, तूचि आठवो ॥

धुवाया इंद्रिय सारवाया मन
व्हावया स्वच्छ दारी आलो ॥

अनिरुध्द नामे घालता कवच
घाण सांग कोठूनी कैसी येई ॥

जीवनाच्या नदीला बांधूनीया घाट
अनिरुध्द माझा धूतो अपराध ॥

पिपा म्हणे माझा अनिरुध्द निश्चय
त्याचेवीण शुध्द कोण करी ॥