Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Mogryacha Gandha from album Pipasa 4

Lyrics of Mogryacha Gandha from album Pipasa 4

मोगर्‍याचा गंध



मोगर्‍याचा गंध, दुरूनी न कळे।
परि येता जवळी, न कळे दुसरे ॥
तैसी माझी गत, व्हावी तुझ्या पायी।
नावडावे काही तुझ्याविण ॥
धन जन मान, वाहतो तुझ्या चरणी।
प्रसाद म्हणूनी तूची जे द्यावे ॥
प्रपंच करीन, तुझी सेवा म्हणून।
तुझी भक्ती करीन प्रपंच म्हणून ॥
दुजा परमार्थ, मजसी न उमगे।
तुला आवडते तेची मी करावे ॥
तू तूच एक, एकला समर्थ।
सांभाळीसी आम्हां वेळी अवेळी ॥
पिपा म्हणे माझे मोडके जीवन।
तूची केले बापू सफळ संपूर्ण ॥