Lyrics of Maza Bapu from album Pipasa5

माझा बापू हा आसरा
माझा बापू हा आसरा, जेव्हा जीव होई घाबरा ॥धृ॥
शब्द सावळ्याचा खरा, घेई संकटीही उडी ।
तारी, भक्त हा आपुला, जरी कोसळल्या दरडी ॥१॥
छाया धरितो, झेलतो बिजलीही शिरी ।
लोळती, जे ह्या चरणांवरी, त्यांची फिटली पापे खरी ॥२॥
वाया घालवी न काही, बनता बनता बनवी ।
माया, चेटकी छळवी, तिजला हाचि हो बांधवी ॥३॥
स्पर्श ह्याच्या दृष्टीचा, गदगद हलवी प्रारब्धा ।
पिसाला, फुटली वाचा, म्हणा हो जय जय अनिरुद्धा ॥४॥