Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Mate Darshan Matre Prani Uddharisi from album Ganapati Aarti

Lyrics of Mate Darshan Matre Prani Uddharisi from album Ganapati Aarti

माते दर्शनमात्रे प्राणी उद्धरिसी



माते दर्शन मात्रे प्राणी उद्धरिसी ।
हरीसी पातक अवघे जग पावन करिसी ।
दुष्कर्मी मी रचिल्या पापांच्या राशी ।
हर हर आता स्मरतों गति होईल कैसी ॥१॥

"जय देवी जय देवी जय गंगामाई ।
पावन करि मज सत्वर विश्वाचे आई ||धृ||

पडले प्रसंग तैशी कर्मे आचरलो ।
विषयांचे मोहानें त्यातचि रत झालो ।
ज्याचे योगें दुष्कृत सिंधुत बुडालो ।
त्यांतून मजला तारिसी ह्या हेतूने आलो ||२|| जय देवी...

निर्दय यमदूत नेती त्या समयी राखी ।
क्षाळी यमधर्माच्या खात्यातील बाकी ।
सत्संगति जन अवघे तारियल त्वा की ।
उरलों पाहे एकचि मी पतितांपैकी ॥३॥ जय देवी...

अघहरणे जय करुणे विनवीतसे भावें ।
नोपेक्षी मज आतां त्वत्पात्री घ्यावे ।
केला पदर पुढें मी मज इतुकें द्यावे ।
जीवें त्या विष्णुच्या परमात्मनि व्हावे ॥४॥
जय देवी ...