Lyrics of Mann Hoy Pakharu from album Pipasa Pasarali

मन होय पाखरू भिरभिरे झाडावरी
मन होय पाखरू भिरभिरे झाडावरी
घरट्याची ओढ जरी रमे तरी सुमनात ॥ धृ ॥
आई घरट्यामधली आता नाही घरट्यात ॥
घरटेच ना झाडात गहिवरत पाखरू ॥ १ ॥
घन सावळ्या पानाचे तरू निळ्या रे गगनी ॥
हाक तीच आली कानी मनी हर्षत पाखरू ॥ २ ॥
आपले घरटे कोणते? आधार आई वृक्षा देते ॥
विराट बाहू पसरते पूर्वा म्हणे अनिरुध्द ॥ ३ ॥