Lyrics of Manah Praanah Pradnya Maajhe from album Pipasa 3

मनः प्राणः प्रज्ञा माझे
मनः प्राणः प्रज्ञा माझे त्रिदल बिल्वपत्र।
जगणे अनिरुद्धासाठी हाच एक मंत्र॥
नाही तुळसीमाळा गळा, नाही रेखिले नाम।
नाही केले गंगास्नान, वगळले चार धाम॥
शोधत होतो काय नक्की, तेही कधी कळले नाही।
मनातली आकृती माझ्या, स्पष्ट कधी झाली नाही॥
पुरुषार्थाचे ध्येय आणि प्रेमाचे साधन दिसले।
अनिरुद्धाचा स्पर्श होता, शोध सारे संपले॥
नुरली नशीबाची लढाई, क्लेश कष्ट सारे सरले।
अनंत श्रमे न मिळे ते, बापूकृपे जवळी आले॥
आभार तरी मानू किती मी, उतराई होणे नाही।
तुझे प्रेम अनिरुद्धा, कधी संपणार नाही॥
जीव लावलासी इतुका, जाहलो मी वेडापिसा।
पाहिले त्या बिल्वपत्री, उमटला तुझा ठसा॥