Lyrics of Man Vadhal Vadhal from album Ailatiri Pailatiri

6. मन वढाळ वढाळ
मन वढाळ वढाळ, धाव बापूकडं घेई।
त्याचा ठाव बापूवीण जगामंदी कोना न्हाई ॥
मन पाखरु पाखरु, भिरभिर रानोमाल।
त्याले शिकवी हो भक्ती, माझा बापू हा प्रेमळ ॥
मन खट्याळ हे पॉर, दुडदुडत व चाली ।
कान धरुनी रस्ता दावी, माझी ज्ञानाई माऊली ॥
मन मोकाट मोकाट, त्याले दाही दिशा वाट ।
त्याले वेसण घाली बापू, हरिनामाचीच थेट ॥
माझ मन न्हाई माझ, खूप देणं लाग तुझं।
फक्त उरलं देहुर, तेही तुझंच रं तुझं ॥