Lyrics of Man Hole Hole from album Bol Bol Vaache

14. मन होले होले जागे
मन होले होले जागे बुद्धी धरू पाहे त्यातें ।
व्यर्थ तन धावपळी, फुका लक्ष येरावळी ॥
हळूहळू नाम धरी जाग कणोकणी येई ।
झडी अनिरुद्धाच्या पायी डोई ठेवा करा घाई ॥१॥
व्याध लागे मागे मागे, जाळे टाकू लागे निके ।
त्यात अडके अडके, जीव घाबरे घाबरे ।
मग रडणं पडणं करी जन्माचे वडणं।
अनिरुद्धाचे स्मरण होई जाळ्याचे तडणं ॥२॥
नाम घ्याऽहो घ्याऽहो घ्याऽहो, अनिरुद्ध अनिरुद्ध ।
करा एकेक एक भाव, एक अनिरुद्ध ॥३॥