Lyrics of Mala Bhetnya Ala Bapu from album Vaini Mhane

10. मला भेटण्या आला बापू
मला भेटण्या आला बापू,
मना ना कळे काय करावे,
पहातची राहिला ॥ धृ ॥
मनी विचार आला तो,
साकारची केला,
पितांबर शेला पिवळा वरी पुष्पमाळा ॥ 1 ॥
धावत धावत आला हा,
अवचीत उभा ठाकला,
इतिहासाची साक्ष देत साई रूप ल्याला ॥ 2 ॥
वैनी म्हणे डोळा राही,
इतुका लहान,
विश्व व्यापुनिया उरे इतुका महान ॥ 3 ॥