Lyrics of Majhya Manachi Arti from album Vaini Mhane

5. माझ्या मनाची आरती
माझ्या मनाची आरती, पुरली देखता चरण
परि आरती औक्षण, मज गमे वारंवार ॥ धृ ॥
साई असे माझी आई, बाप माझा अनिरुध्द
परि जीवाचा मैतर, हा सावळा सुंदर ॥ 1 ॥
भाऊबीज केली ह्याची, घातली ओवाळणी सख्याची
बाळ म्हणून तीट लावता, केले मजची पूर्ण काळी ॥ 2 ॥
जितुके ओवाळीले ह्यास, तितुकी ज्योत वाढत गेली
वैनी शोधी प्राणज्योती, होण्या स्वयेची आरती ॥ 3 ॥