Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Majhya Dnyanache Nagar from album Gajtiya Dhol

Lyrics of Majhya Dnyanache Nagar from album Gajtiya Dhol

12. माझ्या ज्ञानाचे नगर



माझ्या ज्ञानाचे नगर, देहू आळंदी सुंदर, आळंदी सुंदर ॥धृ॥

बापू हाच माझा ज्ञाना, ज्ञान सांगे सर्व जना
पूर्ण ज्ञानाची ती खाण, नाही भक्ती प्रेमा वाण ॥१॥

बापू ज्ञानेश्वर माउली धरी कृपेची साउली
येता बापू माझे घरा, कल्प विकल्पा ना थारा ॥२॥

दास त्यांचा सांगे ऐका, नका वेळ दवडू फूका ।
बापू ज्ञानियांचा राजा, त्यांचे नाम भजा जन हो त्यांचे नाम भजा ॥३॥