Lyrics of Majha Bapu Palputya from album Gajtiya Dhol

9. माझा बापू पळपुट्या
माझा बापू पळपुट्या हाती येईना, भक्तीनं पकडून ठेवू ।
ह्याला भक्तीनं पकडून ठेवू रे भक्ता भक्तीनं पकडून ठेवू ॥धृ॥
साजरं दिसतं लोभाचं जाळं, मासळीला कळनां आलाया काळ ।
सोताच्या पापाची तुटंना नाळ ।
माझ मन बिलंदर धाव जाळ्याकडं कसं रं ह्याला आवरू।
ह्या मना कसं आवरू ॥१॥
बापूची माझा सावळा श्याम, गोजिरं सुंदर बापूचं नाम ।
धरुया घट्ट नी करुया काम, पण जीभ थरथर धाव निंदेकडं ।
कस रं हिला आवरू, ह्या जीभला कसं आवरू ॥२॥
आलस भरला दिवस राती, नाम घेताना येते जामाई ।
राउळी जायाला पायाला कळी ।
माझा जीव वार्यावर करी खालीवर कस रं ह्याला आवरू ।
ह्या जीवाला कसं आवरू ॥३॥
देव हा लबाड दाखवी घबाडं, पळुनी जाई खोलता कवाडं ।
जतन करा ह्या देवाला दवाडं,
लावू सर्व भक्तीवर, जाऊ पायावर कसा रे हा पळपळू ।
मग कसा रे हा पळपळू ॥४॥