Lyrics of Maj Prem Dyavayasi from album Pipasa 3

मज प्रेम द्यावयासी
मज प्रेम द्यावयासी, विठ्ठल झालासी।
तरी खरा अवघा, साईच तू माझा॥
रूपे तुझी शंभर, सहस्र अनंत।
मी का रे बघावी, गरज मज काय? ॥
मत्स्य कूर्म परशुराम, मजसी काय काम?
माझे सुखधाम, अनिरुद्ध नाम॥
माझे मन छोटे, बुद्धीही तोकडी।
त्यात फक्त राहू शके, साई आणि आई॥
गायत्री जपासी, दाविलीस माय।
तिचे तुझे नाते, जाहलो मी साय॥
आम्हा तुझ्या भक्ता, नको दावू दुजी रूपे।
पिपा आनंदतो, बाप आजी संगे॥