Lyrics of Maj Disali Disali from album Pipasa 2

मज दिसली दिसली
मज दिसली दिसली बापूवहिनींची पहिली भेट ।
उघडली सार्या विश्वाची, विश्वाची वहिवाट ॥
हा खेळीया मजबूत त्याने फेकियेला पाश ।
नंदामाई भोळीभाळी, तिला केले सहज वश ॥
रास रंगला रंगला ह्याने अवचित घात केला।
सोडूनिया टिपरीला, अलगद हात धरिला॥
वरी म्हणे कैसा आणि सापडलो तुझ्या जाळी।
तुझ्या मोहाची मोहिनी, आता बनणे लीलाधारी॥
सुचितदाने पिळला कान नंदा झाली स्वप्नगंधा।
जीव रमला रासात, पिपा झाला पूर्ण बंदा ॥