Lyrics of Madhu Swapnanchi Madhur Kathanchi from album Ailatiri Pailatiri

19. मधुस्वप्नांची मधुर कथांची
मधुस्वप्नांची मधुर कथांची लागलीसे ओढ ।
मनाची तूचि छेडी रे तार ॥
विश्व सकळ हे अखिल चराचर ।
भल्याबुर्याची ना मज जाणीव।
तव पायांचा एकचि आश्रय।
तव अंकावर देसी विसावा,
वाहसी रे मम भार ॥
तारुण्याची पहाट झाली ।
रेशीमस्पर्शी आशा फुलली ।
परि निराशे बुद्धी थकली ।
तव वचनांनी माझ्या हृदया,
फुलविसी रे हळूवार ॥
धुके झाकळे कैसे पाहू ।
बुडत्या नशिबा कैसे दोहू ।
इच्छा विपरित पकडे बाहू ।
ऐलतीरी मी पैलतीरी तू,
ने मजसी जलपार ॥
वाट वाकडी बहु वळणाची
किर्रर्र रानी पथ एकाकी
नाही सोबती साथ कुणाची
स्वरवत अलगद येऊनी मजला,
अनिरुद्धा तू तार ॥