Lyrics of Maajhe Bapu from album Pipasa 2

माझे बापू माई नंदा
माझे बापू माई नंदा
मार्ग दाविती सुचितदादा ॥
पदराखाली दिवा धरला ।
वार्यालागी बांध घातला ।
ज्योतिकणांनी उधळीत रंगा ।
ओंजळीत मी प्यालो गंगा ॥
इतुके सोपे जीवन केले।
बसल्या जागी देव आले।
उठून बसण्या दमलो नाही।
हीच काय ती सेवा घडली ॥
जन्म माझा का कशासी।
प्रश्न पडतो दर जिवासी।
ह्या प्रश्नांना उत्तर एकचि।
पिपा जन्मतो बापूसाठी ॥