Lyrics of Kuni Mhane Ram Hyala from album Pipasa 2

सावळा राजा माझा मावळा शूर
ए ऽऽ ऽऽ सावळा राजा माझा मावळा शूर
त्याची टिपरी करी वार दशदिशा तलवार
ए ऽऽ ऽऽ धाव रे धाव मना जोरात धाव जरा
खेळतो कान्हा पुन्हा खेळतो पुन्हा रास रे
कुणी म्हणे राम ह्याला, कुणी म्हणे श्याम
माझिया मनामध्ये अनिरुध्दराम ॥ धृ ॥
जिथे खेळे अनिरुध्द चंद्रभागा तेथे सिध्द
भीवरेच्या लाटांवर एकच नाम ॥ १ ॥
वाळवंटी वृंदावन प्रगटले नामातून
ह्याच्यासंगे नाचणे हाचि आराम ॥ २ ॥
टिपर्यांच्या तालावर नाचू मागे सुरवर
ह्याचिया टिपरीला भक्तांचा नाद ॥ ३ ॥
भान गेले हरपून भक्त जाती हरखून
पाषाणा लागली सावळी तहान ॥ ४ ॥
वार्यावर बात गेली यमुनाही तेथ आली
कालिंदीच्या डोहामध्ये पिपा रचे रास ॥ ५ ॥
ए ऽऽ ऽऽ सावळा राजा माझा मावळा शूर
त्याची टिपरी करी वार दशदिशा तलवार
ए ऽऽ ऽऽ धाव रे धाव मना जोरात धाव जरा
खेळतो कान्हा पुन्हा खेळतो पुन्हा रास रे