Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Kshana Kshanatun from album Pipasa 4

Lyrics of Kshana Kshanatun from album Pipasa 4

क्षणा क्षणातून



क्षणा क्षणातून माझे मीपण,
वाहत असू दे तुझ्याकडे।
वार्‍यावरती गंध जसा रे,
पसरत राही चोहीकडे॥
उपवन माझे, गुलाब माझे मोगराही सुंदर खुलला।
वसंतऋतूचा सुखद बहरही माझ्यासाठी तरतरला।
शिशिर, ग्रीष्म मग पुढे सरकती,
शुष्क जाहली तरु खोडे॥
पतंग माझा उंच उडाला, झाला चंद्रापरता।
आकाशाला शिडी लावूनी, गर्व झाला चढता।
कृष्णविवराने गिळले मजला,
जीवन झाले कोडे॥
आठव करता त्वरीत आला अनिरुद्ध विवरात।
क्षमा मागण्या संधीही नव्हती, विवर मला खेचत।
अनिरुद्धाने गिळले विवरा,
गर्वाचे घर खाली पडे॥
वाटे साधा मानव जैसा, म्हणूनी आम्ही फुगतो।
सहज बोलही व्यर्थ न जाई, ऐकतो तो तरतो।
मूळ ईश हा स्वामी त्रिलोका,
असंख्य पुरावे पिपाकडे॥