Lyrics of Krishna Ugalito Chandan from album Pipasa Pasarali

कृष्ण उगाळीतो चंदन
कृष्ण उगाळितो चंदन। ही तो नाथाघरची खूण ॥ धृ ॥
अनिरुध्द दावी मजसी। पुन्हा त्याची भूमिकेसी ॥
करितो मीचि देवार्चन। सांडी दंभ हा संपूर्ण ॥ १ ॥
राम कर्ता करविता। ह्याचि तत्त्वीं अवघी सत्ता ॥
योग्या अनिरुध्दी शिक्षा। बापुराये दिली ही दीक्षा ॥ २ ॥