Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Kothe Baghu Kothe Jau from album Ovalu Aarti

Lyrics of Kothe Baghu Kothe Jau from album Ovalu Aarti

३. कोठे बघू कोठे जाऊ कोऽठे शोधू



कोठे बघू कोठे जाऊ कोऽठे शोधू
बापू कोठे शोधू।
जेथे जेथे पाहू तेथे माझा अनिरुद्धु ।।ध्रृ।।

ओवाळू रे सखा माझा बाप अनिरुद्धु।
बापूविणा नाही माझा कोणी आधारु ।।१।।

तिन्ही लोकी डंका ह्याचा, अवघा संचरला ।
पदपद्मातून वाहे गंगा भक्ति आचरता ।।२।।

भवभयहरणा चित्सुखसदना कलिमलविषहरणा।
परमानंदा परमपावना भक्तभक्तिरमणा ।।३।।

बिनभावाचे घडे न पूजन, तूची देसी भाव ।
तुझ्या विना ना चलेची युक्ति, कृपा करी आता ।।४।।