Lyrics of Khelalo Bhagalo from album Pipasa Pasarali

खेळलो भागलो, धूळीत मलीन
खेळलो भागलो, धूळीत मलीन,
धूळच होऊन, आलो परती ॥ धृ ॥
पाहता रे तुजला, भरती वाहण्या ॥
खूण पटवण्या, दोन्ही डोळे ॥ १ ॥
तैसाच मलीन, ठेविला मी माथा ॥
चरणी ठेपता, गोड करीसी ॥ २ ॥
पूर्वा म्हणे बापू, कैसा रे तू बाप? ॥
न साहे अमाप, प्रेम तुझे ॥ ३ ॥