Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Karito Amhi Ituki Seva from album Pipasa 2

Lyrics of Karito Amhi Ituki Seva from album Pipasa 2

करितो आम्ही इतुकी सेवा

करितो आम्ही इतुकी सेवा ।
बापूसाठी धावाधाव ॥
जळूनी का हो जीभ न जाई ।
ऐसे उच्चारिता शब्द ॥

करू नका स्ववंचना ।
बापू करितो अमुची सेवा ॥
पिपा म्हणे करणे सेवा ।
हाचि घास हो आपुला ॥