Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Kani Aale Shabda from album Bol Bol Vaache

Lyrics of Kani Aale Shabda from album Bol Bol Vaache

7. कानी आले शब्द



कानी आले शब्द माझ्या सद्गुरुरायाचे।
अन् धाव घेई मन झाले वेडेपिसे ॥धृ॥

सावळाच रंग भाळी चंद्रकोर साजे ।
किती शीतल गं बाई माझा गुरुराव दिसे ॥१॥

किती वर्णावा रुबाब माझ्या सद्गुरुरायाचा ।
करी वर्षाव भक्तांवर आपुल्या प्रेमाचा ॥२॥

बापु बापु बापु अशी साद मी घालिते।
माझे सारे जीवन हे गुरुराया तुज अर्पिते ॥३॥

अरे अरे अरे भक्ता तुला कमी कशाची सांग ।
आहे रक्षण करिता साक्षात पांडुरंग॥४॥