Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Kana Dolyatun from album Pipasa5

Lyrics of Kana Dolyatun from album Pipasa5

काना-डोळ्यातून



काना-डोळ्यातून हा शिरला । हृदयामध्ये जाऊन बसला ॥धृ॥

मजसी वेड लावले त्याने । तो माझा हात न सोडे ॥१॥
नाही केला प्राणायाम । नाही घडली तपश्‍चर्या ॥२॥
रूपध्यान ह्याचे करीता । झाली सप्त चक्रे गोळा ॥३॥
सबळ झाले मनःप्राण । केवळ अनिरुद्धाची आण ॥४॥
ह्या डोळ्यांना दाविले । गंगा त्रिशूळ डमरु साचे ॥५॥
पिपा तिसरा डोळा पाही । कणही भय ते उरले नाही ॥६॥
बापू राहे हृदयस्थ । आपण असावे पदस्थ ॥७॥
तेचि सुख हो शाश्‍वत । जे जे देई अनिरुद्ध ॥८॥
म्हणा अनिरुद्ध अनिरुद्ध । तुम्ही म्हणा अनिरुद्ध ॥