Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Kamal Pahile Mi from album Pipasa5

Lyrics of Kamal Pahile Mi from album Pipasa5

कमळ पाहिले मी राया



कमळ पाहिले मी राया, कमळ पाहिले मी॥धृ॥

काय त्याची सुंदरता, काय त्याचा थाट
चिखलामधूनि वर येऊनि, झळके दिमाखात
राया झळके दिमाखात॥१॥

मधमाशी नेई मध, कधी नारीच्या केसात
कधी सुकूनि उन्हात, कमळ झाकळत
राया कमळ झाकळत॥२॥

इतुके कष्ट केले त्याने, पंकातून दूर गेला
मग व्यर्थ का रे सारे, जीव दुर्दैवात
राया जीव दुर्दैवात॥३॥

पिप्या ऐक माशी तृप्त, सौंदर्याचा गुण सत्त्व
किरण असती बाहू माझे, काहीही ना व्यर्थ जात
काहीही ना व्यर्थ जात॥४॥