Lyrics of Kaay Varanu Mazhe Jivan from album Ailatiri Pailatiri

12. काय वर्णू माझे जीवन
काय वर्णू माझे जीवन, कसे उघडू माझे मन।
काही इलाज चालेना, काही उपाय होईऽना ॥
जीवनाच्या वणव्यात, जळतसे तन मन ।
क्षणोक्षणी राख होई एकएका भावनेची ॥
वृक्ष प्रयत्नांचे पडती, वेली चिकाटीच्या गळती ।
वेदना ही भाजल्याची, एकएका दुःखाची ॥
फुले भाग्याची सुकली, पाने नवीनाची नुरली।
फळे भोगतो नशीबाची, एकएका पापाची ॥
ह्या आगीला विझवाया,
आता यावे हो अनिरुद्धा ।
हाक घाली तो प्रेमाची, एक ऐका बापूंची हो।