Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Jyachya Hrudayi from album Pipasa 1

Lyrics of Jyachya Hrudayi from album Pipasa 1

२१. ज्याच्या हृदयी उठली लहरी



ज्याच्या हृदयी उठली लहरी,
अनिरुध्द नामाची ।
त्याच्या हाती अवघी धरणी,
चराचर कायमची ॥ धृ॥

बाळालागी माऊली,
साऊली होऊनी राही ।
भक्तालागी तैसा माझा
बापू भरला सर्वठायी ॥

दुडू पडू चाले बाळ,
आधारी एक माय ।
वेडूकोडू नाम जपता,
सांभाळी बापूराय ॥

बोट दिले हे सोडूनी,
माय धावे पाठी पाठी।
भक्ते तैसे विस्मरिले,
बापू जागवी वेळोवेळी ॥

बाळ वाढले वय झाले,
माय तरी माय राही।
पिपे देखिले चौबळा रे
कुरवाळिता बापूहाती ॥

तेचि झडपी, पकडी,
देहुडी सावळ्याची।
पिपा लालची, नाही सोडी,
आवडी समचरणांची ॥