Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Jeevani Maajhya Baa Aniruddha from album Pipasa 3

Lyrics of Jeevani Maajhya Baa Aniruddha from album Pipasa 3

जीवनी माझ्या बा अनिरुद्धा



जीवनी माझ्या बा अनिरुद्धा
श्‍वासासंगे येत रहा॥

खोदून पाया तव कुदळीने
गाडूनी टाकी खडे मनीचे
खांब लावूनी नामरूपाचे
घर बांधाया येत रहा॥

तव स्मरणाच्या अखंड भिंती
उभ्या होऊ दे चहुबाजूंनी
आवागमना द्वार नकोचि
घर बांधाया येत रहा॥

वरती छप्पर तव धाकाचे
घट्ट दणकट न उडणारे
आत असावे तू अन् मी रे
घर बांधाया येत रहा॥

नको मजला कुठेही जाणे
नको मजला दुसरे येणे
तुझीच पिपासा जीवनी असणे
असे घर तू बांधशील ना?
घर बांधाया येत रहा॥