Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Je Aale Te Taruni Gele from album Vaini Mhane

Lyrics of Je Aale Te Taruni Gele from album Vaini Mhane

4. जे आले ते तरूनी गेले



जे आले ते तरूनी गेले, जे न आले ते तसेच राहीले
अनिरुध्दाचा झाला तो उरला, दुजा दु:खातची रुतला ॥ धृ ॥

विश्‍वाचे दश दरवाजे, उघडण्या आला अनिरुध्द
एकची दार किलकिलता, उठले सौख्याचे कल्लोळ ॥ 1 ॥

वैनी सांगते अनुभवे, बापू पुरता दयाळू
पापीयासी ना न म्हणे, शिक्षेलागी हा मवाळू ॥ 2 ॥