Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Jau Naradachya Gaava from album Pipasa 2

Lyrics of Jau Naradachya Gaava from album Pipasa 2

जाऊ नारदाच्या गावा



जाऊ नारदाच्या गावा ।
जेथे माझा अनिरुध्द उभा ।
सर्व तीर्थांचे जे मूळ ।
सकळ भक्तांचे ते कूळ ॥

मौजमजा वर्णू किती ।
तेथे सुखाची लयलूटी ॥

गावसीमा धावत येई ।
हीच नामाची पुण्याई ॥
आतूनी नारदाचा जोर ।
मीच उभा का बाहेर ॥

सुख हवे ना रे तुजला ।
मग थांबला कशाला ॥
पिपा सांगतो अनुभवे ।
फक्त अनिरुध्द गावे ॥