Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Jau Kashi Mi Juigavla from album Gajtiya Dhol

Lyrics of Jau Kashi Mi Juigavla from album Gajtiya Dhol

4. जाऊ कशी कशी मी जुईगावला



जाऊ कशी कशी मी जुईगावला गं जाऊ कशी कशी मी बापूगावला ॥धृ॥

कुटलं स्ठेसन् कुटली गाडी । कुटला रस्ता न कुटली वाडी ।
सीमे बाहेरची मोठी खाडी । तरुन जायाला कुठली होडी ॥१॥

हाती पायी बांधल्या दोर्‍या । पोर सोर करिती चोर्‍या ।
काय करावं काय बी कळना । भेटल्या वाचून जीव र्‍हाईना ॥२॥

बापूच्या नावाची करुन होडी । उलथी पाडीन भवभय खाडी ।
स्ठेसन बापू नं गाडी बापू । दोर्‍या कापाया चाकू बी बापू
अन् घाबरू कशी मी जायाला । नक्कीच जायीन जुईगावला ग ।
नक्कीच जायीन बापूगावला ॥३॥