Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Jarasa Maza Hi Hona from album Pipasa5

Lyrics of Jarasa Maza Hi Hona from album Pipasa5

जरासा माझाही हो ना



जरासा माझाही हो ना । सावळ्या माझाही हो ना ॥धृ॥

कुब्जेची तू केली सुंदरा । बिभीषणासी केला राजा ।
नाही मागत ह्यातील काही ।
तरी तू माझाही हो ना ।
जरासा माझाही हो ना । सावळ्या माझाही हो ना ॥१॥

जिने पाजिले जहर तुजला । त्या पूतनेसी केले माता ।
नाही पाजले जलही कधी तुज ।
तरी तू माझाही हो ना ।
जरासा माझाही हो ना । सावळ्या माझाही हो ना ॥२॥

जी लाथ मारली भृगुवर्याने । ती खूण मिरविसी अतिप्रेमाने ।
नाही लाविला हातही कधी तुज ।
तरी तू माझाही हो ना ।
जरासा माझाही हो ना । सावळ्या माझाही हो ना ॥३॥

ह्या सर्वांचे कार्य मोठे । त्यांवर कृपा करणे सोपे ।
कृपा करूनी भक्तांवरती, काय राखिसी तव ब्रीदासी ।
नाही भक्त मी फक्त पिपासा ।
तरी तू माझाही हो ना ।
जरासा माझाही हो ना । सावळ्या माझाही हो ना ॥४॥

तू अनिरुद्ध मी अवरुद्ध । जाणूनी हे तू करी प्रबंध ।
नक्की जाणतो प्रेम तुझे मी ।
म्हणूनी निश्‍चये मी मागतो ।
जरासा माझाही हो ना । सावळ्या माझाही हो ना ॥५॥