Lyrics of Jai Jai Jai Mayureshwara from album Ganapati Aarti

जय जय जय मयूरेश्वरा पंचारति ओवाळू हरा
जय जय जय मयूरेश्वरा
पंचारति ओवाळू हुए ॥ धृ ॥
जय जय जय मयूरेश्वरा
शोभते सुंदर कमलासन है ।
रत्नजडित शिरि मुकुट विराजे ।।
पायी घागरा रुणझुण वाजे ।
श्रीधरा करुणाकरा ॥१॥ जय...
शेंदूर चर्चित केसरी टिळा ।
कंठी झळकत मौक्तिकमाळा ।
कटी कसून पीतावर पिवळा ।
पाशांकुशधरहस्त फणिवरी ॥२॥ जय..
मंगलमूर्ति पार्वतीबाळा ।
सुरवर मुनिजन ध्याती तुजला ।
विघ्न निवारी शमवी सकळा ।
कमलनयन हे मनोहरा ॥ ३ ॥ जय..
धाव पाव रे गौरीनंदना ।
आलिंगुन तुज करि रे वंदना ।
पतित मी पापी शमवी सकला ।
श्रमलो दमलो या संसारा ॥४॥ जय..
करुणास्तव हे परसुनि कानी ।
प्रगट झाली जगत्त्रयजननी ।
शरण मी आलो अति दीनवाणी ।
नरहरिसी दे तव पदी थारा ॥५॥ जय..