Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Ithe Prem Krupa from album Bol Bol Vaache

Lyrics of Ithe Prem Krupa from album Bol Bol Vaache

4. इथे प्रेम कृपा आहे



इथे प्रेम कृपा आहे मायेचा सोहळा।
इथे नयनी भाव आहे भक्तीचा सोहळा॥धृ॥

इथे गदाचक्र आहे अशुद्धाचा नाश।
इथे हृदय उघडे आहे भक्तीचाच पाश॥१॥

इथे शंख पद्म आहे ऐश्वर्य निर्माण।
इथे मन बुद्धी आहे अहंमाचे निर्वाण॥२॥

जिथे अनिरुद्ध राहे तिथे ना अभाव।
जिथे त्याचा भक्त राहे तिथे फळे भाव॥३॥