Lyrics of Indradhanuchya Nadat from album Pipasa5

इंद्रधनुच्या नादात
इंद्रधनुच्या नादात विसरतो आकाश
प्रतिमेच्या मागे सारे, आरशास पुसे कोण॥१॥
भ्रमामागे लागूनिया चुकताती सर्व यत्न
सुखामागे येता दुःख, करपतो इंद्ररंग॥२॥
साईकथेची कावड हेमाड्याने भरलेली
वाहणे रे माझे काम, नेई अनिरुद्धाघरी॥३॥
थेंब थेंब ह्या जलाचा, आभाळचि होई मज
हरले सर्व भास भ्रम, साई दिसला प्रत्यक्ष॥४॥
ह्याच्या चरणावरला थेंब, हाचि जाहला आरसा
पाहणारा ना दिसे हो, नख ना आकाश॥५॥
चरणतीर्थ म्हणूनि पितो, आत ठेवला आरसा
नुरले दुःख नखातही, पिपा सुखी सप्तरंग॥६॥