Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Hya Khotya Kalpana from album Pipasa 4

Lyrics of Hya Khotya Kalpana from album Pipasa 4

ह्या खोट्या कल्पना



ह्या खोट्या कल्पना, दे दे सोडूनी।
ह्या अनिरुद्धाचा धरिला हात मी॥
जे जे वाचले, ते न कळले मला।
जे आकळले, ते न गमले मला॥
जगाचे बोलणे, जगाचे चालणे।
जगाचे पाहणे, न जमले मला॥
नभीच्या तारका, न बनती घरचे दिवे।
मनीच्या वल्गना, न देती यश खरे॥
शुभदे सावळा, देई छत फोडूनी।
घ्यावया धाव गे, पिप्याच्या संगती॥