Lyrics of Hrudayavarati Aniruddhache from album Pipasa5

हृदयावरती अनिरुद्धाचे
हृदयावरती अनिरुद्धाचे नाम रेखिले खरे ।
देव माझा करतो सगळे भले ॥धृ॥
तव चरणांशी भाव गुंतले ।
तुझेची होऊनी मन राहिले ।
भजन करता पाप न उरले ।
गंगेमधूनि अनिरुद्धाचे नाम ऐकले खरे ॥१॥
मंदिर तीर्थे शोधत फिरले ।
ऋषी-मुनींनी तपही केले ।
अब्ज जपांचे विक्रम घडले ।
त्या तेजातून अनिरुद्धाचे रूप पाहिले खरे ॥२॥
श्रुति-स्मृतिंनी वर्णन केले ।
पुराणांनी जन्म कथिले ।
भागवतांनी गायन केले ।
परि पिसाने नामालाची ग्रंथ मानिले खरे ॥३॥