Lyrics of Houni Bebhan from album Pipasa 1

१४. होऊनी बेभान
होऊनी बेभान, होऊनी बेभान
पहा कसा नाचे माझा भक्तांसंगे अनिरूध्द ॥ धृ ॥
पाय शिणले ना याचे युगे अठ्ठावीस ।
रास खेळता ना दुखले हात याचे रातंदिस ।
कटीवरी हात आणि उभा उडी मारण्यास ।
भक्तासंगे नाचताना गदा होई मोरपीस ॥ १ ॥
गायी चारताना, लोणी चोरताना ।
ठकविले ह्याने सांगा किती पामरांना ।
दोन्ही हात पसरूनी पहा नाचताना ।
एक एका पाऊलासी गुंतवी जनांना ॥ २ ॥
देहभान विसरूनी नाचे रंगरंगे ।
ऐसा भक्त मिळताचि दावी अंतरंगे ।
रंगूनि रंगात जाई नाचे नामदंगे ।
पिपा ठकवी बापूला नाचूनी अरंगे ॥ ३ ॥