Lyrics of Herambha Shivakuladipaka from album Ganapati Aarti

हेरंब शिवकुलदीपका, तुज आरती गणनायका
हेरंब शिवकुलदीपका, तुज आरती गणनायका ॥ धृ ॥
सिंदुरासुर मर्दुनि, सुरा सोडविले त्रासातूनि ।
देवगण तुज वंदूनि, स्वस्थानी गेले हर्षूनि ॥ १ ॥
हेरंब..
दर्शने तब श्रीपती. मनः कामना सिद्धीस जाती ।
स्वयंप्रकाशित तू गजवदना, नीराजन दीप काय तुला ॥२॥
हेरंब...
मंगलारती गुफुनि, ही आरती द्वारकासुत गातो ।
आरती ओवाळीती, आरती ओवाळीती
हेरंब...