Lyrics of He Swapna Manasiche from album Bol Bol Vaache

16. हे स्वप्न मानसीचे
हे स्वप्न मानसीचे जागृत आज झाले ।
स्वप्नातील बीजाचे तरु साज रुप ल्याले ।
ऋतभाव माधुरीचे नयनात आज आले ।
मूक शब्द स्पंदनाचे स्वर सूर साद प्याले ॥धृ॥
नित्यात नित्य राही, छंदात छंद राही ।
आवेग अंतरीचा मनःपूत व्यक्त होई ।
पाहून वाट तुमची मी आज तृप्त झाले ।
हळूवार स्वप्नराशी उमलीत सत्य धाले ॥१॥
घन सांद्र निळ आदि हुंकार तूच असशी ।
अनिरुद्ध आकृतीचा निर्द्वन्द्व ॐ रमसी ।
आतून आज अवघी मी पूर्ण शुद्ध झाले ।
निर्माल्य पुष्पराशी उमलीत गंध आले ॥२॥