Lyrics of Hari Rupa Aniruddhe from album Bol Bol Vaache

5. हरिरुप अनिरुद्ध
हरिरूप अनिरुद्धे पृथ्वीतत्त्वासी आले।
हरतत्त्व अनिरुद्धे मायोपाधित झाले।
भयदुःख अनिरुद्धे सज्जनांचे पळाले।
बोल बोल वाचे श्रीअनिरुद्ध आले॥धृ॥
अत्यंत प्रीती नामे भजन शुद्ध भावे।
करावे सदा रंगरंगूनी स्वभावे।
अनिरुद्ध स्तवनातें मन रंगवावे।
पाप ताप जळती अनळ सहज भावे॥१॥
सकल दुष्ट बीजे नासती मानसीची।
अखिल संत मीते नाचती सहस्रीची।
अनिरुद्ध नाद जैसा उठे अंतरीचा।
सुखानंदकंद तैसा होय जीवनाचा॥२॥
जगी नाचते सैन्य ते दानवांचे।
शिरी लावती मुंडके सज्जनांचे।
तुझिया पदी अर्पितो शुद्ध भाव।
खलमर्दनाचा जाणूनी तुझा भाव॥३॥
तव कृपा कवणाही दूर कधी करे ना।
जाणूनी असंख्य पापे क्रोध कधी धरेना।
पद कमळ वंदाया सर्व सृष्टी निघाल्या।
अनिरुद्ध पाहताना सर्व दृष्टी निमाल्या॥४॥