Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Hachi Navava from album Pipasa 1

Lyrics of Hachi Navava from album Pipasa 1

१०. हाचि नववा नववा आगळा



हाचि नववा नववा आगळा।
सजीव बनला पंढरीचा पुतळा ॥ धृ॥

चक्र कमळ लपवूनी आला।
सावळ्या रंगे ठक पकडला ॥ १॥

कटीवरले हात काढूनी।
पसरले ह्याने सामोरी ॥
परि हासता स्मित दिसता ।
ह्यासी ओळखिला थोरांनी ॥ २॥

सूर बासुरी वेणु माधुरी।
कुठे टाकिली? कुठे राखिली?
परि मुखे अभयस्वर निघता।
वेढिला ह्यासी भक्तांनी ॥ ३॥

मोरपीस खोचिले कुठे?
रंगरंगिले साजसाजिरे ॥
परि निमिष ती नजर मिळता।
भिजविले रंगे गोपांनी ॥ ४॥

धरियेली शृंखला हाती ।
दावे बांधण्या कोण्या कंठी ॥
ना धरी करी शस्त्र मी ।
मोडूनी स्वत:ची ग्वाही ॥ ५॥