Lyrics of Ha Yeto Kadhi from album Ailatiri Pailatiri

4. हा येतो कधी
हा येतो कधी नि जातो कधी
याचा नाही ठाव लागला ॥
हा भक्तीचा भुकेला
ह्याला नैवेद्य प्रेमाचा
बापू कुबेर प्रीतीचा ॥
ह्याला मुकुट श्रद्धेचा
हा नायक नीतिचा
ह्याचा दंडक धर्माचा ॥
कुठे शोधाल सांगा ह्याला
ह्याचा ठाव गाव हो कुठला
हा राहे तुमच्या हृदयी
ह्याचा गाव सर्वांठायी ॥
जो भक्तांसाठी धावत येई
अन् लेकुरांसी जवळी धरी
असा अनिरुद्ध माझा स्वामी ॥