Lyrics of Gulabphoolanchya Paaklyanvari from album Pipasa 3

गुलाबफुलांच्या पाकळ्यांवरी
गुलाबफुलांच्या पाकळ्यांवरी झुलतो अनिरुद्ध।
ह्याचा भार न होई कुणा॥
सूर्य देतसे प्रकाश ऊर्जा, परि देतसे ताप।
पाऊस बरसे जीवनजल, तरी महापुरी आकांत।
अनिरुद्धाची न्यारीच करणी, सौम्य कार्य जाणा॥
मायबापही बोलून दावती, केले उपकार।
परके जन तर उपकारासी करिती अपकार।
करूनी सर्व हा मूक राही, हपापला ना माना॥
मनही स्वतःचे ओझे होई, बुद्धीला ठेची।
अश्रूंचे ढग पापण्यातले, तसेच भरून राहती।
अश्रूंनी त्या अभिषिक्त, असा हा सार्वभौम राणा॥
जड हा देह, जड प्रारब्ध, भार होई जीवना।
असे उद्याचा भार आजला, भार ज्योतीचा होई वातीला।
सौम्य मृदू अन् मधुर राहणे हा ह्याचा बाणा॥
कर्मे आणि जन्म ह्याचा, भार न होई पिपा।
भक्तांसाठी अनिरुद्धाने घेतले या वाणा।
मुळावरती घाव घालतो, उरू न दे कारणा॥