Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Gopa Vaishnavanche from album Pipasa Pasarali

Lyrics of Gopa Vaishnavanche from album Pipasa Pasarali

गोप वैष्णवांचे



गोप-वैष्णवांचे वेची रज:कण ।
प्रेमपारायण बापू माझा ॥ धृ ॥

धावे तो बेभान वैष्णवांचे पाठी ।
जेवी एका ताटी गोपांसवे ॥
उठाउठी भेटी आलिंगी वैष्णवां ।
वेड या केशवा भक्तांचेचि ॥ १ ॥

भक्तांचिया बोला पडो नेदी खाली ।
सोसे वनमाळी गर्भवास ॥
योग्या अनिरुध्दी बापूचि बापूसम ।
इतुके अनंत प्रेम फक्त त्याचे ॥ २ ॥